Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रइंधनावरून भांडण! पेट्रोल पंप मालकाने ठेवली अनोखी शर्त

इंधनावरून भांडण! पेट्रोल पंप मालकाने ठेवली अनोखी शर्त

देशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढीचे (Petrol Diesel Price) सत्र सुरूच आहे. गेल्या 17 दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price Hike) 14 वेळा वाढ झाली आहे. 22 मार्चपासून आतापर्यत पेट्रोलसह डिझेलच्या दरात प्रत्येकी तब्बल 10 रुपयांनी वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल 105 रुपये 41 पैसे तर डिझेल 96 रुपये 67 पैसे प्रतिलिटर दराने विकले जात आहे. तर मुंबईत एक लिटर पेट्रोल खरेदी करण्यासाठी 120 रुपये 51 पैसे तर डिझेलसाठी 104 रुपये 77 पैसे मोजावे लागत आहे. अशातच महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर शहरात एका पेट्रोल पंप मालकाने इंधन विक्री करताना अनोखी शर्त ठेवली आहे.

नागपूर शहरातील एक पेट्रोल पंप मालकाने 50 रुपयांपेक्षा कमी रुपयांचे पेट्रोल देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. याबाबत पेट्रोल पंपावर एक स्टीकर देखील चिटकवण्यात आले आहे.

पेट्रोल पंप मालक रविशंकर पारधी यांनी सांगितले की, पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. काही लोक वाहनात 20-30 रुपयांचे पेट्रोल भरण्यासाठी येतात. परंतु मशीनचा वेग प्रचंड आहे. पंप कर्मचारी नोझल उचलताच वाहनाच्या टाकीत 20-30 रुपयांचे पेट्रोल पडते. त्यावरून लोक पंप कर्मचाऱ्याशी हुज्जत घालतात. भांडण करतात. त्यावरून तर कधी-कधी हाणामारी देखील होत असते. त्यामुळे आम्ही वीज बचत आणि पंपावर होणारी भांडणे थांबवण्यासाठी 50 रुपयांपेक्षा कमी पेट्रोल मिळणार नाही, अशी अट ठेवली आहे. दरम्यान, नागपूर शहरात सध्या लिटर पेट्रोलसाठी 120 रुपये 16 पैसे तर डिझेलसाठी 102 रुपये 88 पैसे मोजावे लागत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -