Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगगावाकडे निघालेल्या मित्रांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, दोघांचाही जागीच मृत्यू

गावाकडे निघालेल्या मित्रांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, दोघांचाही जागीच मृत्यू

निलंगा शहरातून गावाकडे निघालेल्या  दुचाकीला भरधावात असलेल्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे. दुचाकीवरील दोघेही मित्र होते. रात्री उशिरा गावाकडे जात असताना निलंगा-औराद शहाजनी मार्गावरील एका पूलावर ही दुर्घटना घडली आहे. गाव 10 किमी अंतरावर असतानाच ही दुर्घटना घडली आहे. गुंजरगा येथील बालाजी राम शिंदे व सूर्यकांत वाघंबर शिंदे या दोघांचा या घटनेत जागीच मृत्यू झाला आहे.

रात्री उशिरा दुचाकीवर निघाले होते गावाकडे
बालाजी शिंदे व सूर्यकांत शिंदे हे लहानपनापासूनचे मित्र होते. कामानिमित्त ते बुधवारी निलंगा शहरात आले होते. काम आटोपून निलंग्याहून रात्री ते उशिरा गुंजरगा या गावाकडे निघाले होते. दरम्यान, निलंगा-औराद रोडवरील उदगीर मोडपासून जवळच असलेल्या ज्ञानोबा बोधले यांच्या शेताजवळ त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता.

वाहनाचा तपास सुरु, गावात शोककळा
या दुर्घटनेत दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याने गुंजरगा गावावर शोककळा पसरली होती. घटनेची माहिती मिळताच निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.आर. शेजाळ व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. उपचारासाठी त्या दोघांना निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन केल्यानंतर गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निलंगा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून अज्ञात वाहनाचा तपास सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -