Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगएसटी कर्मचाऱ्यांचे शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन; चप्पल, दगडांची फेकाफेकी

एसटी कर्मचाऱ्यांचे शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन; चप्पल, दगडांची फेकाफेकी

एसटी कर्मचाऱ्यांनी आज अतिरेक करताना थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिशेने मोर्चा वळवला. एसटी कर्मचाऱ्यांनी आज शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करताना थेट चप्पल फेकली. त्याचबरोबर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला.
सुरू असलेल्या एसटी कर्मचार्यांाच्या संपाला मुंबई उच्च न्यायालयानेच गुरुवारी अल्टिमेटम दिला. या कर्मचार्यांयना 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याची शेवटची मुदत न्यायालयाने दिली असून, त्यानंतरही कामावर न येणार्याा कर्मचार्यांंना काढून टाकण्याचे अधिकार एसटी महामंडळ आणि राज्य सरकारला असतील.

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी झालेल्या सुनावणीत कामगारांना बडतर्फीच्या कारवाईपासून 22 एप्रिलपर्यंतचे अभय मिळाले. सर्व कर्मचार्यां ना कर्मचार्यांमना वेळेवर वेतन देण्याबरोबरच थकीत निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी, पीएफ आणि पेन्शन देण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिले.
22 एप्रिलपर्यंत जे कामावर रुजू होणार नाहीत त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा मार्ग एसटी महामंडळ आणि राज्य सरकारला खुला असेल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असलेल्या संपकरी कामगारांनी रात्री उशिरापर्यंत संप मागे घेतलेला नव्हता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -