पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (पीएम आवास योजना) वाटप करण्यात आलेल्या पक्क्या घरांची संख्या ३ कोटींच्या वर गेली आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सोशल मीडियाद्वारे दिली. गरीब लोकांना पक्की घरे मिळावीत तसेच महिलांचे सबलीकरण व्हावे, या हेतुने केंद्र सरकारकडून पीएम आवास योजना राबविली जाते. देशातील प्रत्येक गरिबाला पक्के घर देण्याचा सरकारचा निर्धार आहे. या पार्श्वभूमीवर तीन कोटी घरांचे वाटप झाल्याचा टप्पा मैलाचा दगड ठरला आहे, असे मोदी यांनी संदेशात पुढे म्हटले आहे.
वाटप करण्यात आलेली घरांमध्ये सर्व मुलभूत सुविधा आहेत, एका अर्थात महिलांच्या सबलीकरणाचे मोठे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, असेही मोदी यांनी नमूद केले आहे. केंद्रात रालोआचे सरकार स्थापन झाल्यानंतर 2015 साली पंतप्रधान ग्रामीण आवास योजना हाती घेण्यात आली होती.
सुरुवातीला दोन कोटी घरांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले होते. 31 मार्च 2022 पर्यंत हे उद्दिष्ठ ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात या कालावधीत 2.52 कोटी घरांचे वाटप करण्यात आले होते. वरील योजनेसाठी सरकारकडून 1.95 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. दुसरीकडे पंतप्रधान शहरी आवास योजनेअंतर्गत 58 लाख घरांचे वाटप करण्यात आलेले आहे. यासाठी 1.18 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
पीएम आवास योजना : ३ कोटींपेक्षा जास्त लोकांना पक्क्या घरांचे वाटप; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -