एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे मुंबईतील राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थानी चप्पल आणि दगडांची फेक करत आंदोलन केले आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी तयारी दर्शवली आहे. सुळे म्हणाल्या की, “मी मुंबई पोलिसांचे मनापासून आभार मानते. कारण, माझ्या घरावर अचानक हल्ला झाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले. मी हात जोडून सर्वांना विनम्रपणे विनंती आहे की, माझी आणि आमच्या नेत्यांची चर्चेला तयार आहे. जी काही चर्चा करायची आहे, ती शांततेच्या मार्गाने व्हावी, इतकीच अपेक्षा आहे.”
माझ्या घरावर अचानक झालेला हल्ला हा दुर्दैवी आहे. माझ्या घरातील लोकांना पहिल्यांदा सावरावं लागेल. जर प्रश्न सोडवायचे असतील, तर शांततेच विचार आणि चर्चा करून सोडवावे लागलीत. असे आंदोलन करून काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे शांततेच्या मार्गाने आम्ही एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहोत”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसमोर दिली.