Tuesday, December 24, 2024
Homeक्रीडाPBKS vs GT IPL Match Result: राहुल तेवतियाचे शेवटच्या दोन चेंडूंवर दोन...

PBKS vs GT IPL Match Result: राहुल तेवतियाचे शेवटच्या दोन चेंडूंवर दोन SIX, गुजरात टायटन्सची विजयाची हॅट्रिक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

क्रिकेट रसिकांना आज आयपीएलमध्ये रोमांचक सामना पहायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सवर (GT vs PBKS) शेवटच्या चेंडूवर थरारक विजय मिळवला. सलामीवीर शुभमन गिलने (Shubhaman Gill) 59 चेंडूत 96 धावांची खेळी करुन विजयाचा पाया रचला, तर राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) त्यावर कळस चढवण्याचं काम केलं. शेवटच्या षटकात गुजरात टायटन्सला विजयासाठी सहा चेंडूत 19 धावांची गरज होती. पंजाब किंग्सचा ओडियन स्मिथ षटक टाकत होता. स्मिथने पहिला चेंडू वाईड टाकला.

विजयासाठी सहा चेंडूत 18 धावा हव्या होत्या. त्यावेळी डेविड मिलरने धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यात चांगली फलंदाजी करणारा हार्दिक पंड्या रनआऊट झाला. अखेरच्या दोन चेंडूत विजयासाठी 12 धावांची गरज होती. राहुल तेवितया स्ट्राइकवर होता. त्याने दोन चेंडूत दोन षटकार ठोकून गुजरातला रोमांचक विजय मिळवून दिला. पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना नऊ बाद 189 धावा केल्या. गुजरातला विजयासाठी 190 धावांचे लक्ष्य मिळाले. ते त्यांनी शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं. आयपीएलमध्ये डेब्यू करणाऱ्या गुजरातने विजयाची हॅट्रिक केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -