Sunday, July 27, 2025
Homeराजकीय घडामोडीउद्धव ठाकरे म्‍हणाले, "आम्ही छुपी युती करत नाही; काेल्‍हापूर 'उत्तर'मध्‍ये शिवसैनिक काॅंग्रेसलाच...

उद्धव ठाकरे म्‍हणाले, “आम्ही छुपी युती करत नाही; काेल्‍हापूर ‘उत्तर’मध्‍ये शिवसैनिक काॅंग्रेसलाच मतदान करणार”

ताजी बातमी ऑनलाइन टीम

“कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. पंचगंगा नावाप्रमाणे स्वच्छ असली पाहिजे, युपीतल्या गंगेप्रमाणे नसावी. बेळगावमधील मराठी बांधवांसाठी भाजपा रस्त्यावर उतरली का? आम्ही ठरवतो ते करून दाखवतो. आम्ही छुपी युती करत नाही. त्यामुळे प्रत्येक शिवसैनिक काॅंग्रेसला मतदान करणार आहे”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले .



विधानसभेच्‍या कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काॅंग्रेसच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित व्हर्च्युअल सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. भाजपावर टीका करताना ते म्हणाले की, “विरोधकांकडे बोलण्यासारखे काही मुद्दे नाहीत. भाजपाचा नकली हिंदुत्वाचा बुरखा फाडला पाहिजे. आम्ही युती तोडली नाही, तुम्ही दगा दिलात. अमित शहांनी दिलेलं वचन मोडलं. भाजपासारखी छुपी युती आम्ही करत नाही. आम्ही आमच्या झेंड्याचा रंग बदलला नाही”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.



केंद्रीय सरकारवर टीका करताना ठाकरे म्हणाले की, “रेशन दिल्याचा डंका पिटता; पण ते शिजवायचं कशावर? गॅसच्या किमती वाढल्या आहेत यावर देवेंद्र फडणवीस काहीबोलले का? आम्ही दर कमी करत जायचे आणि तुम्ही दर वाढवत जायचे. पैसे खाण्याऱ्या भाजपाला का मत द्यायचं? खोटं सांगून इतर राज्यांत तुमचं राजकारण चालत असेल, इथं चालणार नाही. बेळगाव महापालिकेवर फडकवलेला भाजपाचा झेंडा नकली आहे”, अशीही टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
“राजकीय कुस्त्या झाल्‍यास भाजप लगेच धाडी टाकेल. धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम काही जणांकडून केले जात आहे. विरोधक धार्मिक मुद्दा पुढे नेहमी पुढे करतात. आम्‍ही कमी पडलो तरी, चालेल पण खोटं बोलणार नाही. बोलायला काही नसेल की, लगेच खोटे आरोप करायचे. तुम्‍हाला सोडलं म्‍हणजे आम्‍ही हिंदुत्‍व सोडल नाही. भाजप म्‍हणजे हिंदुत्‍व नाही. खोट बोलू पण रेटून बोलू, असे भाजपा करत आले आहे”, असा आराेपही त्‍यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -