Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रया भागात आज पावसाचा इशारा, विदर्भात उष्णतेची लाट तीव्र होणार!

या भागात आज पावसाचा इशारा, विदर्भात उष्णतेची लाट तीव्र होणार!


राज्यावर पुन्हा पावसाचे  सावट आहे. कोकणासह  मध्य महाराष्ट्रात  आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागाध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे या भागामध्ये आज पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने  दिला आहे. तसंच, अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले असून उन्हाचा चटका देखील कमी झाला आहे. पण विदर्भासह (Vidharbh) उर्वरित महाराष्ट्रात मात्र कमाल तापमान 42 अंशाच्या पुढे पोहोचल्याने उकाडा आणखी वाढला आहे.

आज मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. तर पुढील तीन दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, एप्रिलमध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा पारा 39 अंशापासून 46 अंशापर्यत जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात 11 एप्रिलपर्यंत ढगाळ वातावरण राहिल आणि वाऱ्याचा वेग सुद्धा वाढेल. राज्यात 38 अंशापासून 45 अंशापर्यंत उन्हाचा पारा वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने (IMD Alert) वर्तवला आहे.

तर, 11 एप्रिलपर्यंत सांगली, पुणे, कराड उमरगा, देवणी, सोलापूर, आटपाडी, इस्लापूर, रत्नागिरी, चिपळूण, वाई, सातारा या भागात चार दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. तर तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. सध्या विदर्भात सूर्य आग ओकत आहे. विदर्भात तापमानात मोठी वाढ झाली असून उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
उन्हाचे चटके बसत असल्यामुळे नागरिक थंड ठिकाणी बसण्याचा आणि शीतपेयाचा पर्याय निवडत आहेत.

राज्यात रविवारी सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद अकोल्यात झाली. रविवारी अकोल्यात 43.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झली आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी तापमानाचा पारा हा 42 अंश सेल्सिअसच्या वर आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात सरासरीपेक्षा 3 ते 5 अंशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे विदर्भात उन्हाच्या झळा जास्त वाढल्या आहेत आणि उकाडा आणखी जाणवू लागला आहे. तर येत्या बुधवारपर्यंत विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -