तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल आणि त्यासाठी शाखेत जावे लागत असेल तर ते काम लवकर पूर्ण करा. कारण या आठवड्यात बँका चार दिवस बंद राहू शकतात. त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची लिस्ट नक्कीच तपासा. मात्र असे करण्यात अयशस्वी झाल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकाल.
वास्तविक, या आठवड्यात बँका फक्त तीन दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार आणि बुधवार सुरू राहतील. यानंतर गुरुवारपासून सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. यापैकी एक दिवस म्हणजे रविवार सुट्टीचा असेल तर उर्वरित तीन दिवस सणांशी संबंधित आहेत. मात्र, या सुट्ट्या प्रत्येक राज्यानुसार बदलू शकतात.
14 एप्रिल : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती गुरुवारी आहे. याशिवाय महावीर जयंती, बैसाखी, तामिळ नववर्ष, बिजू महोत्सव, बिहू आदी साजरे केले जातील. या दिवशी शिलाँग आणि शिमला वगळता देशाच्या इतर भागात बँका बंद राहतील.
15 एप्रिल: शुक्रवार गुड फ्रायडे आहे. बंगाली नववर्ष, हिमाचस डे, विशू यांसारखे सणही आहेत. या दिवशी जयपूर, जम्मू आणि श्रीनगर वगळता इतर ठिकाणच्या बँकांना सुट्टी असेल.
16 एप्रिल : बोहाग बिहू शनिवारी आहे. गुवाहाटीमध्ये या दिवशी बँका बंद राहतील.
17 एप्रिल : रविवारी सर्व बँकांना सुट्टी आहे.
21 एप्रिल रोजी अगरतळातील बँकांना गरिया पूजेमुळे सुट्टी असेल.
23 एप्रिलला महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.
24 एप्रिलला रविवार असल्याने बँकांना सुट्टी आहे.
शब-एकदर/जमाल-उल-विदा 29 एप्रिल रोजी आहे. त्यामुळे जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहणार आहेत.
RBI सुट्यांची लिस्ट जारी करते
बँक सुट्ट्यांची लिस्ट RBI ने जारी केली आहे. वर्षाच्या सुरूवातीस, मध्यवर्ती बँक बँकांसाठी सुट्ट्यांची लिस्ट रिलीज करते. त्यामुळे कर्मचारी आणि बँक ग्राहकांना सोपे जाते.