Saturday, January 11, 2025
Homeब्रेकिंगभीषण दुर्घटना! रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या पाच जणांचा भरधाव एक्स्प्रेसने चिरडले, अनेक जखमी

भीषण दुर्घटना! रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या पाच जणांचा भरधाव एक्स्प्रेसने चिरडले, अनेक जखमी



आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम  जिल्ह्यात सोमवार रात्री रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या अनेक नागरिकांना भरधाव एक्स्प्रेसने चिरडले. या घटनेत पाज जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना सोमवार रात्री 9 वाजेच्या सुमारास श्रीकाकुलम जिल्ह्यात सिगादम आणि चिपुरपल्ली रेल्वे स्टेशनदरम्यान घडली.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही प्रवाशांनी विशाखापट्टनम-पलासा मेन लाईनवर साखळी ओढून कोयंबटूरहून सिलचर जाणाऱ्या एक्स्प्रेस थांबवली. गाडी थांबताच काही प्रवाशी उतरुन रेल्वे रुळ ओलांडत असताना दुसऱ्या बाजुने भुवनेश्वर-सीएसटी मुंबई कोणार्क एक्स्प्रेस भरधाव वेगात आली. काही लोकांना भुवनेश्वर-सीएसटी मुंबई कोणार्क एक्स्प्रेसने चिरडले. पाज जणांचा जागेवरच मृत्यू झाला. काही नागरिक जखमी झाली आहे. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहेत. मृतदेह आणि जखमींना त्याच एक्स्प्रेसने श्रीकाकुलम रोड स्टेशनपर्यंत आणण्यात आले. नंतर तेथून अँम्बुलन्सने हॉस्पिटसमध्ये नेण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -