उत्तरप्रदेश सरकारने निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील पूल चक्क कोलकात्ता येथील आहे त्यावरून वाद सुरू झाला आहे. त्यामुळे भाजप सरकारला हे प्रकरण अंगलट आले आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर उत्तरप्रदेशच्या मुख्य सचिवांनी माफी मागितली आहे.
सत्ताधारी भाजप सरकारने आज वृत्तपत्रामध्ये राज्यातील विकास कामे दाखवणारी एक जाहिरात दिली आहे.
‘ट्रान्सफॉर्मिग उत्तर प्रदेश अंडर योगी आदित्यनाथ’ अशा शीर्षकाखाली ही जाहिरात आहे.
या जाहिरातीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो आहे. तसंच राज्याची प्रगती आणि विकास दाखवण्यासाठी इतरही फोटो देण्यात आले आहेत.
या फोटोत एक पूलही दाखवला गेला आहे. मात्र, हा पूल पश्चिम बंगालमधील कोलकात्याचा आहे. या पुलावर एक टॅक्सी जाताना दिसते.
ही टॅक्सी पिवळी असून ती पश्चिम बंगालची ओळख आहे. यावरून तृणमूल काँग्रेसने उत्तरप्रदेश सरकारवर हल्लाबोल केला आहे.
तृणमूल काँग्रेसचे नेते आणि ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी ट्वीट करून योगी आदित्यनाथ सरकरावर हल्लाबोल केला आहे.
ट्रान्सफॉर्मिंग यूपी म्हणजे पश्चिम बंगालमधील पायाभूत सुविधांचे फोटो चोरणं, असं आहे का?’ असा सवाल केला आहे.
ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात बांधण्यात आलेला पूल हा आपल्या राज्यातील असल्याचा दावा योगी सरकार करत आहे,’ असा टोलाही बॅनर्जी यांनी लगावला आहे.
अभिषेत बॅनर्जींसह पक्षाचे नेते मुकुल रॉय यांनीही ट्वीट करत भाजवर हल्लाबोल केला आहे.
‘उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्री बदलता येत नसल्याने पंतप्रधान मोदी हे असहाय्य दिसत आहेत.
आता यूपी सरकार हे पायाभूत सुविधा आणि विकासाचा दावा करताना पश्चिम बंगालमधील फोटो दाखवत आहे.’
तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनीही यावरून यूपी सरकारवर टीका केली आहे.
अतिरिक्त मुख्य सचिवांनी मागितली माफी
दरम्यान, जाहिरातीवरून राजकीय वादाला तोंड फुटल्याने उत्तरप्रदेश मधील या जाहिरातीतील पूल कोलकाता येथील असल्याचा वाद सुरू झाल्यानंतर भाजप सरकारची गोची झाली आहे.
उत्तर प्रदेशच्या माहिती प्रसारण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नवनीत सहगल यांनी या प्रकाराबाबद्दल दिलिगिरी व्यक्त केली आहे.
तसेच पब्लिशरमुळे ही चूक झाल्याचं त्यांनी म्हटले आहे. त्यांनी संबंधित वृत्तपत्राचं ट्वीट हे रिट्वीट करून म्हटलं आहे.
तसंच वृत्तपत्रानेही आपल्या ट्वीटमध्ये दिलगिरी व्यक्त केली आहे. आक्षेप घेण्यात आलेले फोटो हे जाहिरातीतून हटवण्यात आले आहे, असे वृत्तपत्राने म्हटले आहे.
उत्तरप्रदेश सरकारने चोरला कोलकात्याचा पूल
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -