Tuesday, December 24, 2024
Homeनोकरीराज्य शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीला मंजूरी, जीआर जारी

राज्य शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीला मंजूरी, जीआर जारी

एमपीएससी परीक्षेची (MPSC Exam) तयारी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. राज्य शासनाच्या (Maharashtra Government) विविध विभागात रिक्त पदांवर भरतीसाठी (MPSC Recruitment) शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी खात्यातील रिक्त पदांवरील भरतीला अर्थ विभागाने मंजूरी दिली आहे. यानंतर राज्य सरकारकडून याबातचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच ट्विटर हँडलवर उपलब्ध आहे.

राज्य शासनाच्या 43 शासकीय विभागात मिळून जवळपास अडीच लाखांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. कोरोना साथीच्या रोगाच्या (Corona Pandamic) काळात अर्थ विभागाने घातलेल्या निर्बंधामुळे भरती प्रक्रिया राबवण्यात आली नाही. मात्र येत्या काळात राज्याच्या विविध विभागांमध्ये पदांची भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एमपीएससी (MPSC) कक्षातील 100 टक्के पदे भरण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. 11 फेब्रुवारी 2016 च्या शासन निर्णयानुसार शासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध मंजूर करून घेतला आहे. त्यानुसार ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीसंदर्भात शासनाकडून आज रोजी शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. pic.twitter.com/jHU4xWDOAG

— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) April 12, 2022

काय आहे जीआर?
ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या 11 फेब्रुवारी 2016 च्या शासन निर्णयनुसार सुधारित आकृतीबंध मंजूर केला, त्या आकृतीबंधातील एमपीएससीच्या कक्षेतील पदे वगळता 50 टक्के पदे भरता येतील असे राज्य शासनातर्फे जारी करण्यात आलेल्या जीआरमध्ये म्हटले आहे.
तसेच ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम मजूर केले आहेत. अशा सुधारित आकृतीबांधतील एमपीएससी कक्षातील 100 टक्के पदांच्या भरतीस परवानगी देण्यात आली आहे.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांतर्गत 4 मे 2020 चे निर्णय लागू झाल्यानंतरच्या कालावधीत उच्चस्तरीय समितीने आणि उपसमितीने मान्यता दिलेली एमपीएससी कक्षातील 100 टक्के पदे भरण्यास मान्यता असेल.

1085 पदांची भरती
एमपीएससीच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 अंतर्गत 1 हजार 85 पदांची भरती केली जणार आहे. याअंतर्गत 100 सहाय्यक कक्ष अधीकारी, 609 राज्य कर निरीक्षक आणि 376 पोलीस उपनिरीक्षकांची पदे भरली जाणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -