अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा अर्थात JEE Advanced Exam 2022 पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेची नवीन तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT Mumbai) मुंबईने परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे. आता जेईईची परीक्षा येत्या 28 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात येणार आहे. याआधी जेईई परीक्षा 3 जुलै 2022 रोजी होणार होती.
जे विद्यार्थी जेईई परीक्षेची तयारी करत आहे त्यांना परीक्षेचे नवीन वेळापत्रक jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. जेईई परीक्षेसंदर्भात अपडेट माहिती जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहेत. त्याचसोबत जेईई परीक्षेचे दोन पेपर घेण्यात येणार आहे. या पेपरच्या वेळा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिला पेपर 9 ते 12 या वेळेत असेल तर दुसरा पेपर हा 2.30 ते 5.30 या वेळेमध्ये असणार आहे.
ऑगस्टमध्ये होणाऱ्या जेईई परीक्षेचा निकाल सप्टेंबरमध्ये लागणार आहे. उमेदवारांची उत्तरपत्रिका 1 सप्टेंबर रोजी वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी तात्पुरत्या उत्तर पत्रिका वेबसाईटवर दिसेल. 11 सप्टेंबरला अंतिम उत्तरपत्रिका पाहायला मिळेल. तर याच दिवशी म्हणजे 11 सप्टेंबर रोजी जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
दरम्यान, जेईई मेन्सची परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली होती. एनटीएने जेईई मेन्स परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यामध्ये घेण्याची घोषणा केली होती. पण ही परीक्षा जून आणि जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आता नवीन वेळापत्रकानुसार ही परीक्षा जून, जुलैमध्ये होणार आहे. पहिले सत्र 20 ते 29 जून दरम्यान होईल. तर दुसरे सत्र 21 ते 30 जुलै दरम्यान होणार आहे.
JEE परीक्षा पुढे ढकलली, आता 28 ऑगस्टला होणार परीक्षा!
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -