Monday, December 23, 2024
Homeतंत्रज्ञानशाईविना चालणारा, खिशात बसू शकेल असा स्वस्तातला प्रिंटर; वाचा किंमत

शाईविना चालणारा, खिशात बसू शकेल असा स्वस्तातला प्रिंटर; वाचा किंमत

ताजी बातमी ऑनलाइन टीम

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळानंतर आता लोकांचे ऑफिस सुरु झाले आहेत आणि लोकं आता वर्क फ्रॉम होमवरुन आता ऑफिसमध्ये जाऊन काम करु लागले आहेत. प्रत्येक ऑफिसमध्ये प्रिंटरची गरज असते. कोणत्याही कार्यालयात प्रिंटरची गरज असतेच. पण तुम्हाला वाटत असेल की प्रिंटर खरेदी करणं खूप खर्चिक असेल पण तसं नाहीये. कारण सध्या बाजारात आपल्याला परवडतील असे प्रिंटर उपलब्ध आहेत.
सध्या बाजारात उपलब्ध असलेले प्रिंटर आपण पाहिले तर आपला विश्वास बसणार नाही कारण आपल्या खिशात बसू शकतील असे प्रिंटर सध्या बाजारात मिळतात. त्याला आपण आपल्या फोनलाही कनेक्ट करु शकतो. हा प्रिंटर आपल्याला घ्यायचा असेल तर आपण Amazon वरुन खरेदी करु शकतो. Paperang कंपनीचा हा प्रिंटर आपण आपल्या फोनला कनेक्ट करुन खिशात घेउन फिरु शकतो. विशेष म्हणजे या प्रिंटर साठी शाईची गरज नाही.



कंपनीच्या या प्रिंटरची किंमत सध्या २७९९ रुपये इतकी असून ऑनलाईन पद्धतीने ते आपण खरेदी करु शकता. हे एक थर्मल प्रिंटर असून स्मार्टफोन, कॉम्प्युटर, मॅकबुक यांच्यासोबत वापरु शकतो. त्यामध्ये १०00mAH ची बॅटरीही दिली जाते.
कसा कराल वापर?



हे प्रिंटर वापरण्यासाठी आपल्याला Paperang नावाचं एक अॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. त्या अपमध्ये आपल्याला काही डिटेल्स मिळू शकतील. त्यामध्ये फॉन्ट, फिल्टर, थीम, टेम्प्लेट आणि इतर ऑप्शन मिळतात. त्यामध्ये आपल्याला पेपर रोलसहित चार्जिंग केबल पण दिलेली आहे. शाईविना हे प्रिंटर काम करत असल्याने त्यासाठी खर्च खूप कमी लागतो. याला आपण ट्रेन, बस, घर आणि इतर ठिकाणी कुठेही वापरु शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -