Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : वादळी पावसात पोल्ट्रीचे शेड जमीनदोस्त

कोल्हापूर : वादळी पावसात पोल्ट्रीचे शेड जमीनदोस्त

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात शेवाळे येथील संतोष पांडुरंग गावडे यांचे नव्याने बांधलेले पोल्ट्रीचे शेड जमीनदोस्त झाले. त्यामध्ये दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.


पाटणे-शेवाळे मार्गावरील महादेव मंदिराजवळ संतोष गावडे यांनी बँकांची कर्जे उचलून नव्यानेच पोल्ट्री शेड उभे केले होते. 6000 कोंबडय़ा सामावल्या जातील, असे दोनशे दहा बाय तीस फूट । क्षेत्रफळाचे त्यांनी पोल्ट्री शेड उभे केले होते. शनिवारी सायंकाळी झालेल्या तुफानी वादळी वारयात हे शेड जमीनदोस्त झाले. यामध्ये पत्रे फुटून आणि खांबे मोडून दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अजूनही पक्षी आणलेले नव्हते. अन्यथा अधिकच नुकसान झाले असते. नव्याने व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने तरुणाने बँकांचे कर्ज घेऊन धाडस करावे आणि अस्मानी संकटात होत्याचे नव्हते व्हावे, असा प्रकार शेवाळे येथे घडला असून प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा करून संतोष गावडे यांना भरपाई द्यावी, अशी मागणी होत
आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -