बँकांच्या कामकाज वेळेमध्ये मोठा बदल झाला आहे. याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. 18 एप्रिल म्हणजेच आजपासून बँका (Bank) सुरु होण्याच्या वेळेमध्ये बदल झाला आहे. आजपासून बँका सकाळी 10 ऐवजी 9 वाजल्यापासून सुरु होणार आहे. म्हणजे आता बँक रोज एक तास आधी सुरु होणार आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे बँक बंद होण्याची वेळ पूर्वी प्रमाणेच राहणार आहे. बँक बंद होण्याच्या वेळेमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.
18 एप्रिलपासून बँक एक तास आधी सरु करण्यात याव्यात असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिले होते. आरबीआयच्या आदेशानुसार आजपासून रोज बँका 9 वाजता सुरु होणार आहेत. आरबीआयने जाहीर केलेल्या या नव्या नियमांचा सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार आहे. कारण बँकेची कामं त्यांना लवकर पूर्ण करता येणार आहे. बँकेच्या वेळेत एक तासाने वाढ झाल्यामुळे आता बँकेचे काम जास्त वेळ चालणार आहे.
अनेकदा बँकांमध्ये मोठी गर्दी असते, सामान्य नागरिकांना आपली काम करुन घेण्यासाठी तासंतास रांगेत उभे राहावे लागते. तर बऱ्याच लोकांचा ऑफिस टाईम हा सकाळचा असतो. अशावेळी त्यांना बँकेची काम पूर्ण करण्यास अडचणी येतात. आतापासून बँक 9 वाजता सुरु होणार असल्यामुळे या लोकांना आपली बँकेची कामं पूर्ण करुन ऑफिसला जाणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना बँकेमध्ये जास्तवेळ रांगेत उभे राहावे लागणार नाही. आरबीआयच्या या निर्णयाचा सर्वात जास्त फायदा हा ऑफिसला जाणाऱ्यांना होणार आहे.
कोरोनापूर्व काळामध्येच बँकेच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला होता. कोरोनापूर्व काळापासूनच बँका सकाळी 9 वाजता सुरु करण्यात याव्यात असे आदेश आरबीआयने दिले होते. पण कोरोना काळामध्ये पुन्हा बँकेच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आणि बँके उघडण्याची वेळ 10 वाजता करण्यात आली होती. आता सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे आता पुन्हा बँका त्याच्या पूर्वीच्या वेळेमध्ये म्हणजेच सकाळी 9 वाजता सुरु होणार आहेत.