Tuesday, July 8, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातील अनाधिकृत भोंग्यावर होणार मोठी कारवाई, गृहमंत्रालयाकडून मिळणार निर्देश

राज्यातील अनाधिकृत भोंग्यावर होणार मोठी कारवाई, गृहमंत्रालयाकडून मिळणार निर्देश

राज्यात मशिदीवरील भोंग्यांवरून राजकारण तापले असताना गृहमंत्रालयाकडून एक महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. राज्यातील धार्मिक स्थळांवरील अनाधिकृत भोंग्याबाबत आता मोठी कारवाई होणार आृहे. धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरचा वापर करायचा असेल तर त्यासाठी योग्य परवानगी घ्यावी लागणार आहे. याबाबत लवकरच गृहमंत्रालयाकडून निर्देश जारी करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज, सोमवारी दुपारी याबाबत पोलिस महासंचालक (DGP) आणि वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. त्यानंतर राज्यातील सर्व पोलिस आयुक्त आणि अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश देण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पहाटे लावण्यात येणाऱ्या भोंग्यांवर बंदी येणार
पहाटे लावण्यात येणाऱ्या भोंग्यांवर बंदी येणार अशी माहिती गृह मंत्रालय सूत्रांनी दिली. तसेच, भोंगेच्या आवाजावर ही मर्यादा येणार आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिस धार्मिक स्थळावरील अनधिकृत भोंगे आहे का, याबाबत माहिती घेणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे, लागणार आहे, असे देखील निर्देश गृहमंत्रालयाने पोलिसांना दिले आहेत. त्याचबरोबर अधिकृत परवानगी मिळाल्यास रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत धार्मिक स्थळावर भोंगे लावता येणार नाहीत.
 
राज ठाकरे यांनी उठवला होता आवाज…

दरम्यान, राज्यात भोंग्यावरून राजकारण सुरू झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवर लावण्यात येणाऱ्या भोंग्याविरोधात गेल्या काही दिवसांपूर्वी आवाज उठवला होता. मशिदीवरील भोंगे 3 मे पर्यंत न उतरवल्यास मशिदींबाहेर हनुमान चालिसा लावू असा अल्टीमेटम राज ठाकरे यांनी दिला होता. आता या मुद्द्यावर राज्याच्या गृहमंत्रालयाने गांभीर्याने विचार करण्यास सुरूवात केली आहे.

दुसरीकडे, आता नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी भोंग्यांबाबत एक आदेश जारी केला आहे. शहरातील सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे, असे पोलिस आयुक्तांनी म्हटले आहे. धार्मिक स्थळांनी 3 मे पर्यंत भोंग्यांसाठी परवानगी घ्यावी, असे नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी म्हटले आहे. परवानगी न घेतलेल्या संबंधित अनधिकृत भोंग्यांवर कारवाई केली जाणार, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

काय आहेत आदेश?

– नाशिक पोलिस आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार, कुठल्याही मशिदीच्या 100 मीटर परिसरात हनुमान चालीसा म्हणण्यास मनाई.
– अजानच्या वेळी हनुमान चालीसा लावता येणार नाही. मशिदीत अजान होण्याच्या 15 मिनिटं आधी हनुमान चालीसा लावता येईल.
– धार्मिक स्थळांवर कोण्याही कार्यक्रमासाठी भोंगे लावायचे असल्यास परवानगी आवश्यक.
– आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -