Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर :10 तोळे दागिने लंपास ; राजारामपुरीत भरदिवसा चोरी

कोल्हापूर :10 तोळे दागिने लंपास ; राजारामपुरीत भरदिवसा चोरी

राजारामपुरी पहिल्या गल्लीतील रूपाली सुभाष पाटील यांचा बंगला भरदिवसा फोडून चोरट्यांनी पाच लाख 50 हजारांचे 10 तोळे दागिने लंपास केले. रूपाली पाटील व त्यांच्या वृद्ध आई हेमलता सोमवारी (दि. 11) दुपारी 12 वाजता नातेवाईकांकडे गेल्या होत्या. घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्याने टेरेसवरून बंगल्यात प्रवेश केला. तिजोरीसह कपाट व बॅगामधील साहित्य विस्कटून टाकले.

तिजोरीतील 6 तोळ्यांचा श्रीमंत हार,4 तोळ्यांच्या नक्षीदार बांगड्या व अन्य वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या. गुरुवारी दुपारी हा प्रकार निदर्शनास आला. शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. माहितगार संशयिताने चोरी करून दागिन्यांवर डल्ला मारला असावा, असा संशय आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -