इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील दोन सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात गुरुवारी नवी मुंबईतल्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर आमनेसामने येतील. मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल ट्रॉफी पाच वेळा उंचावली आहे, तर चेन्नई सुपरकिंग्सने चार वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. हे दोन संघ स्पर्धेतील सर्वात तगडे मानले जातात. असं म्हटलं जायचं आयपीएल म्हणजे अशी स्पर्धा जिथे सर्व संघ मिळून मुंबई आणि चेन्नईसोबत प्लेऑफमध्ये लढण्यासाठी खेळत असतात. परंतु तो आता इतिहास आहे. दोन्ही संघाची सध्याची स्थिती त्यांच्या नावाला साजेशी नाही. दोन संघांची आयपीएल-2022 (IPL 2022) मधील आतापर्यंतची कामगिरी चांगली झालेली नाही.
रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत आणि हे सर्व सामने त्यांनी गमावले आहेत तर चेन्नईने सहापैकी केवळ एक सामना जिंकला आहे. दोन्ही संघ पॉईंटय टेबलवर सर्वात तळाशी आहेत. चेन्नईचा संघ नव क्रमांकावर आहे, तर मुंबई दहाव्या क्रमांकावर आहे. पॉईंट्स टेबलवर चेन्नईचे दोन गुण आहेत, तर मुंबईने अद्याप खाते उघडलेले नाही. रोहित शर्माचा संघ सध्या दबावाखाली असून संघाचा क्रिकेट संचालक झहीर खाननेही ही गोष्ट मान्य केली आहे.
आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समधील सामना 21 एप्रिलला म्हणजेच गुरुवारी खेळवला जाणार आहे.
आयपीएल 2022 मध्ये, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात नवी मुंबईतली डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर सामना खेळवला जाणार आहे.
आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यासाठी नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता खेळाला सुरुवात होईल.
आयपीएल 2022 मधील मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल.