Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातील या जिल्ह्यात वादळी-वाऱ्यासह पावसाचा इशारा, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

राज्यातील या जिल्ह्यात वादळी-वाऱ्यासह पावसाचा इशारा, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट आहे. हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस (Rainfall) पडण्याचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशामध्ये आता पुन्हा हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात आला आहे.

भारतीय हवामान खात्याने पालघर (Palghar), नाशिक (Nashik), धुळे (Dhule) आणि नंदुरबार (Nandurbar) या जिल्ह्यांमध्ये पुढच्या तीन ते चार तासांमध्ये पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसंच या जिल्ह्यातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. भारतीय हवामान खात्याने ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे.

महाराष्ट्रातील पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचबरोबर या भागांमध्ये हलक्या आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता देखील आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, त्याचसोबत शेतकऱ्यांनी देखील आपल्या पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

तसंच, कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 21 ते 24 एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पावसामुळे आणि हवामानातील बदलामुळे काजू, आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. सध्या या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. पाऊस आणि या वातावरणामुळे आंबा आणि काजू बागेचे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -