पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या एक दिवस अगोदरच जम्मूमध्ये सुरक्षा आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू आहे. CISF च्या 15 जवानांना घेऊन जाणाऱ्या एका बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. मात्र या जवानांनी हा हल्ला परतवून लावला आणि या हल्लेखोर दहशतवाद्यांना पळवून लावलं.
जम्मू येथील चड्ढा कॅम्पजवळ पहाटे 4.15 वाजता 15 सीआयएसएफ जवानांना कामावर घेऊन चाललेल्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे (CISF) 15 जवान सकाळच्या शिफ्टमधल्या ड्युटीसाठी निघाले होते. त्यावेळी पहाटे साधारण 4 वाजून 25 मिनिटांनी जम्मूमधल्या चड्ढा कॅम्पजवळ दहशतवाद्यांनी या जवानांच्या बसवर हल्ला केला. मात्र या जवानांनी हा हल्ला परतवून लावला. त्यांनी या दहशतवाद्यांचा यशस्वी प्रतिकार केला आणि दहशतवाद्यांना पळवून लावलं.
सीआयएसएफच्या एका अधिकाऱ्याने या प्रकरणाची माहिती दिली. लष्कर या हल्ल्याला प्रत्युत्तर देत असताना दहशतवाद्यांनी तेथून पळ काढाला, असे अधिकाऱ्याने सांगितले. सीआयएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या कारवाईदरम्यान एक एएसआय शहीद झाला आणि इतर दोन जवान जखमी झाले आहेत.
या चकमकीमध्ये शहीद झालेल्या जवानाचे नाव मुकेश सिंह असे आहे. ते जम्मू झोनचे एडीजीपी या पदावर कार्यरत होते. सध्या परिसर रिकामा करण्यात आला आहे. चकमक अजुनही सुरू आहे. अजून या परिसरात दहशतवादी लपून बसलेले आहेत, अशी माहिती समोर येत आहे.