Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवशी येणार Kisan निधीचा 11 वा हप्ता

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवशी येणार Kisan निधीचा 11 वा हप्ता

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोदी सरकार छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना मोठी भेट देणार आहे. योजनेच्या 12 कोटी 50 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे.  पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांची असते.

वर्षातून तीन वेळा शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांची रक्कम वर्ग केली जाते. हे हप्ते दर चार महिन्यांनी येतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय्य तृतीयेला म्हणजेच 3 मे रोजी पंतप्रधान मोदी स्वतः हा हप्ता जारी करतील अशी अपेक्षा आहे. कारण गेल्या वर्षी देखील 15 मे रोजी हप्ता जारी करण्यात आला होता.

11 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. तत्पूर्वी शेतकऱ्यांना केवायसी अपडेट करावे लागेल. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 11व्या हप्त्यासाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आहे. ई-केवायसी करण्याची अंतिम तारीखही सरकारने 31 मे पर्यंत वाढवली आहे.

पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये अलिकडेच सुधारणार करण्यात आली होती. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी (eKYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही आधीच्या कॉर्नर पर्यायाला भेट देऊन किंवा जवळच्या सीएससी (CSC) केंद्राला भेट देऊन आधार आधारित ओटीपी (OTP) प्रमाणीकरण थेट करू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -