Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीभडक भाषणे करून पोट भरत नाही, सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंवर निशाणा

भडक भाषणे करून पोट भरत नाही, सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंवर निशाणा

भडक भाषणे करून पोट भरत नाही. मी वास्तवात जगणारी मुलगी असून, महागाई हेच आत्ताचे सर्वात मोठे आव्हान आहे. अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर मनसे नेते राज ठाकरे यांच्याकडून केल्या जाणार्यात टीकेला पवारांच्या लेकीने ” लढ लुगी मैं…” अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

सदानंद सुळे यांना आलेल्या इन्कम टॅक्स विभागाच्या नोटीसीवरही सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, आम्ही नोटिसीबाबत कोणतीही तक्रार केली नाही असे म्हणत, लढ लुगी मै… असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी दुपारी कराडमधील प्रीतिसंगम बाग परिसरातील स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी भेट दिली. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भडक भाषणांबाबत आपले मत व्यक्त केली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री स्व. अरूण जेटली आणि स्व. सुषमा स्वराज यांच्या संसदेतील वक्तव्याची आठवण करून दिली.

अमोल मिटकरी यांच्या वादग्रस्त विधानाबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अगोदरच भूमिका स्पष्ट केल्याचे सांगत, या विषयावर अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. आपण कोणत्याही नेत्यावर टीका करत नाही आणि आपली तशी इच्छाही नाही. मात्र राज ठाकरे यांच्या भाषणातील सर्व मुद्दे आपण सप्रमाण खोडून काढू शकतो, असेही सांगण्यास खासदार सुप्रिया सुळे विसरल्या नाहीत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -