आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स सामन्यादरम्यान मोठा वाद झाला. नो बॉल दिला नाही म्हणून कर्णधार ऋषभ पंत याच्यासह दिल्लीच्या संघातील काही खेळाडूंनी पंचांशी वाद घातला. याची गंभीर दखल ‘बीसीसीआय’ने घेतली असून, ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर आणि प्रशिक्षक प्रवीण आम्रे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रवीण आम्रे यांच्यावर एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.
दिल्ली कॅपिटल्सला अखेरच्या षटकात ३६ धावांची गरज हाेती. ओबेड मकॉयच्या शेवटच्या षटकामध्ये पहिल्या व तिसर्या चेंडूवर पॉवेलने षटकार ठाेकत सामना रोमांचक केला. ओबेडने टाकलेला तिसरा चेंडू कमरेवर असल्याने पॉवेलने पंचांकडे नो बॉल देण्याची मागणी केली; पण त्यांनी काेणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या वेळी डग आउटमध्ये बसलेला दिल्ली कॅपिटल्स कर्णधार ऋषभ पंत रागाने लालबूंद झाला. ताे खेळपट्टी असणाऱ्या दोन्ही फलंदाजांनी माघारी बोलावू लागला. भरपूर वेळ हा वाद सुरु राहिला. यावेळी शार्दुल ठाकूर आणि प्रशिक्षक प्रवीण आम्रे यांनीही पंचाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी शेन वॉटसन ऋषभला शांत करत खिलाडू वृत्ती दाखवण्याचा आग्रह केला. त्यानंतर ऋषभ पंत शांत झाला. शेन वॉटसन यांचा ऋषभ पंतला समजवतानाचा फोटो सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. वॉटसन यांनी मध्यस्थी केल्यानंतर ऋषभ पंतचा राग शांत झाला. यानंतर काही काळासाठी थांबलेला सामना पुन्हा सुरू झाला. या प्रकराची गंभीर दखल ‘बीसीसीआय’ने घेतली, ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर आणि प्रशिक्षक प्रवीण आम्रे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. ऋषभ पंत यांला एका सामन्यातील मानधन कपात, शार्दुल ठाकूरला एका सामन्याचे मानधनात ५० ट्क्के रक्कम कपात तर प्रवीण आम्रे यांच्यावर एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. ( RR vs DC )
मागील वर्षी कॅप्टन कूल म्हणून ओळख असलेल्या धोनीनेही अंपायरच्या निर्णयावर असहमती दर्शवत खेळपट्टीवर जात मॅच थांबवली होती.