ताजी बातमी ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृत्यर्थ जाहीर झालेला पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येणार आहेत. माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहामध्ये आज सायंकाळी हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी संपूर्ण मंगेशकर कुटुंब (Mangeshkar Family) उपस्थित राहणार आहे. पंतप्रधानांच्या या मुंबई दौऱ्यानिमित्त सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
pm narendra modiमास्टर दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान, मंगेशकर कुटुंबीय, हृदयेश आर्ट्सच्या वतीने मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा ८०वा स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात पहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारासह संगीत, नाटक, कला आदी क्षेत्रातील पुरस्कारही प्रदान केले जाणार आहे.
संगीत क्षेत्रासाठीतील मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार गायक राहुल देशपांडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. चित्रपट सेवेसाठीचा मास्टर दीनानाथ विशेष पुरस्कार आशा पारेख आणि जॅकी श्रॉफ यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर समाजसेवेसाठीचा मास्टर दीनानाथ आनंदमयी हा पुरस्कार मुंबईचे डबेवाले (नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट) यांना देण्यात येणार आहे. तसंच सर्वोत्कृष्ट नाटकासाठी पुरस्कार संज्या छाया नाटकास देण्यात येणार आहे.