Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगगुड न्यूज! महागाई भत्त्यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचे 4 भत्ते वाढणार

गुड न्यूज! महागाई भत्त्यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचे 4 भत्ते वाढणार

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये (DA) वाढ करण्यात आल्यामुळे ते आनंदी होते. त्यांच्या आनंदाच आता आणखी भर पडणार आहे. महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ केल्यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये देखील मोठी वाढ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या इतर भत्यात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
डीए वाढल्याने प्रवास भत्ता आणि शहर भत्ताही वाढणार आहे. यासोबतच भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीमध्ये आपोआप वाढ होईल. केंद्रीय कर्मचार्यां चा मासिक पीएफ आणि ग्रॅच्युइटी मूळ वेतन आणि डीएमधून मोजली जाते. अशा परिस्थितीत डीए वाढल्याने पीएफ आणि ग्रॅच्युइटी देखील वाढण्याची शक्यता आहे. ऐवढंच नाही तर डीए वाढल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता (एचआरए) आणि प्रवास भत्ता (टीए) ही वाढणार आहे. ही वाढ ३ टक्क्यांपर्यंत असू शकते, अशी माहिती समोर आली आहे.

३० मार्च रोजी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ केली होती. त्यामुळे अवघ्या 9 महिन्यांत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए दुपटीने वाढला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आता 34 टक्के दराने डीए आणि डीआर मिळणार आहे. डीएमध्ये वाढ झाल्याचा फायदा देशभरातील 50 लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना होणार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -