Monday, February 24, 2025
Homeब्रेकिंगस्वस्त रेशनसाठी ‘हे’ लोक ठरणार अपात्र, थेट रेशनकार्ड रद्द केलं जाणार..!

स्वस्त रेशनसाठी ‘हे’ लोक ठरणार अपात्र, थेट रेशनकार्ड रद्द केलं जाणार..!

रेशनकार्ड.. एक महत्वाचा सरकारी दाखला.. सरकारकडून मिळणारा भारतीय नागरिक असल्याचा खणखणीत पुरावा.. सरकारी, तसेच खासगी कामासाठी सर्रास वापरला जाणारे महत्वाचं कागदपत्रं.. शिवाय रेशनकार्डच्या माध्यमातूनच गोरगरीब जनतेला स्वस्तात धान्याचा लाभ घेता येतो…
कोरोना संकटात अनेकांच्या रोजीराेटीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे सरकारनं त्यावेळी गरजू लोकांसाठी रेशनवर मोफत अन्नधान्याचे वाटप सुरू केलं. ते अजूनही सुरू आहे. मात्र, या योजनेचा अनेकांना गैरफायदा घेतल्याचे आता समोर आलं आहे. अशा अपात्र लोकांमुळे खऱ्या लाभार्थींना मात्र रेशन मिळाले नाही.

ही बाब निदर्शनास आल्यानंतर सरकारने रेशनकार्डबाबत आणखी कडक नियम आणले आहेत. या नियमांनुसार, अपात्र लोकांनी स्वत:हून आपलं रेशनकार्ड सरकार दरबारी जमा करावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी लवकरच रेशनकार्डधारकांची तपासणी केली जाणार आहे.. त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे..
दरम्यान, अपात्र लोकांवर कारवाई करण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा कडक नियम आणले आहेत. कोणत्या परिस्थितीत रेशनकार्ड रद्द होऊ शकते, याबाबतची माहिती त्यात दिली आहे… याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

स्वस्त रेशनसाठी कोण अपात्र..?
• कुटुंबाकडे मोटार कार, ट्रॅक्टर, एसी, हार्वेस्टर, पाच केव्ही किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेचा जनरेटर असल्यास..
• 100 चौरस मीटरचा प्लॉट, घर, पाच एकरांपेक्षा जास्त जमीन, एकापेक्षा जास्त शस्त्र परवाना असल्यास..
• ग्रामीण भागातील ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपये, तर शहरी भागातील ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये आहे, असे कुटुंब..
• तसेच करदाता कुटुंब शासकीय रेशन योजनेसाठी (Government Ration Scheme) अपात्र आहेत.
सगळी वसुली होणार..
वरील नियमानुसार, अपात्र रेशनकार्डधारकांनी स्वत:हून आपले रेशनकार्ड तहसील किंवा ‘डीएसओ’ कार्यालयात जमा करावं.. तपासणीत तसं आढळल्यास, संबंधित व्यक्तीचं रेशनकार्ड रद्द करण्यात येईलच, शिवाय अशा कुटुंबावर कायदेशीर कारवाईही केली जाणार आहे. जेव्हा पासून स्वस्त रेशनचा लाभ घेतला असेल, तेव्हापासून त्याची वसूली करण्यात येणार आहे..

सरकारकडून सातत्याने रेशनकार्डधारकांची यादी अपडेट करण्यात येत असते.. त्यात काही तफावत आढळल्यास रेशनकार्ड रद्द केले जाते.. तसेच रेशनकार्डवर बराच काळ स्वस्त धान्याचा लाभ न घेतल्यास, संबंधित लाभार्थीस त्याची गरज नसल्याचे समजून त्याचे कार्ड रद्द करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता..

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -