Saturday, July 5, 2025
Homeमहाराष्ट्र12 वर्षीय मुलीसमोर रिक्षाचालकाचे किळसवाणं कृत्य

12 वर्षीय मुलीसमोर रिक्षाचालकाचे किळसवाणं कृत्य

पुण्यात गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत असताना एक संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीसमोर हस्तमैथुन करणाऱ्या एका विक्षिप्त रिक्षाचालकाला पोलिसांना (Pune Police) अटक केली आहे. सचिन देवीदास शेंडगे (वय-33) असे आरोपीचे नाव आहे. हिंजवडीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हिंजवडी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

हिंजवडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 22 एप्रिल, शुक्रवारची ही घटना आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारात पीडित 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी क्लास करून घरी जात होती. तितक्यात आरोपी रिक्षाचालक तिच्याजवळ आला. तिला पत्ता विचारण्याच्या बघाण्याने थांबवलं आणि तिच्यासमोरच हस्तमैथुन केले. रिक्षाचालकाचं किळसवाणं कृत्य पाहून पीडित मुलगी घाबरली. तिने घरी गेल्यानंतर सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितलं.

पीडितेच्या पालकांनी हिंजवडी पोलिस स्टेशन गाठून रितसर तक्रार नोंदवली. तक्रारीची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी दोन पथके तयार केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आजू बाजुला बसवलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी दापोडी परिसरातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतले. आपण ओळखू येऊ नये म्हणून आरोपीने त्याच्या रिक्षावरील रेडिअम काढून टाकले होते. पीडितेने आरोपीला ओळखले. हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम सन 2012 कलम 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल सागर काटे आणि राम गोमरे पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -