Monday, July 28, 2025
Homeक्रीडागुजरातचा शेवटच्या चेंडूवर विजय, अऩ् पांड्याच्या बायकोचा 'आनंद माझा गगनात मावेना' !

गुजरातचा शेवटच्या चेंडूवर विजय, अऩ् पांड्याच्या बायकोचा ‘आनंद माझा गगनात मावेना’ !

गुजरात टायटन्सचा फिरकीपटू राशिद खानने बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात दमदार फटकेबाजी केली. गुजरात टायटन्स वि. सनराईजर्स सामन्यात गुजरात टायटन्सकडून खेळताना राशिदने शेवटच्या षटकात तीन षटकार लगावत गुजरात टायटन्सला दिमाखदार विजय मिळवून दिला.

राशिद खानचं दमदार फिनिशिंग
सामन्यावर सनराईजर्स हैदराबादची मजबूत पकड होती. गुजरात टायटन्सला शेवटच्या षटकात विजयासाठी २२ धावांची आवश्यकता होती. पण आपल्या आक्रमक गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या राशिद खानने हैदराबादचा गोलंदाज मार्को जेन्सनची धुलाई केली.

शेवटच्या षटकात काय झाले?
गुजरात टायटन्सला शेवटच्या षटकात विजयासाठी २२ धावांची गरज होती. सनराईजर्स हैदराबादकडून अनुभवी मार्को जेन्सनला शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी देण्यात आली. जेन्सनच्या पहिल्याच चेंडूवर राहुल तेवतियाने षटकार लगावला आणि दुसऱ्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली. यानंतर गुजरात टायटन्सला ४ चेंडूमध्ये १५ धावांची गरज होती. त्यानंतर राशिद खानने तिन्ही चेंडूवर षटकार लगावले.

राशिद खानने सामना खेचून आणला

राशिद खानने शेवटच्या षटकात तिसऱ्या चेंडूवर मार्को जेन्सनला षटकार लगावला. तर शेवटच्या दोन चेंडूमध्ये ९ धावांची गरज होती. पाचव्या चेंडूवरही राशिदने षटकार मारला. यानंतर एका चेंडूमध्ये ३ धावांची गरज असताना राशिदने शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत गुजरात टायटन्सकडे विजय खेचून आणला.

सामन्यादरम्यान नताशाचे जोरदार सेलीब्रिशन

गुजरात टायटन्सने सामना जिंकल्यानंतर हार्दिक पंड्याची पत्नी नताशा डान्स करत जोरदार सेलीब्रेशन करताना दिसत आहे. उमरान मलिकच्या गोलंदाजीने गुजरात टायटन्सला धक्के दिले असतानाच राशिद खानच्या खेळीने गुजरात टायटन्सला विजय मिळवून दिला त्यानंतर नताशाने जोरदार सेलीब्रेशन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -