ताजी बातमी ऑनलाईन टीम
एमपीएससीच्या परीक्षेची (MPSC Exam) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (MPSC Student) महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 साठी (MPSC Exam 2021) प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठी प्रवेश प्रमाणपत्रे जारी करण्यात आली आहेत. उमेदवार एमपीएससीची अधिकृत वेबसाईट (MPSC Website) http://mpsconline.gov.in ला भेट देऊन हे प्रवेशपत्र पाहून ते डाऊनलोड करु शकता. ही परीक्षा येत्या 7 ते 9 मे दरम्यान होणार आहे.

एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश प्रमाणपत्र बाळगणे आवश्यक असणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी हे प्रवेश प्रमाणपत्र एमपीएससीच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन त्याची प्रिंटआऊट काढून घेणे गरजेचे आहे. या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारेच त्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार आहे.