Friday, August 1, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : शिवमूर्तीचे मिरवणुकीने जयंतीसाठी आगमन

कोल्हापूर : शिवमूर्तीचे मिरवणुकीने जयंतीसाठी आगमन

तिथीप्रमाणे अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी होणार्याम पारंपरिक शिवजयंती सोहळ्याअंतर्गत गुरुवारी संयुक्त मंगळवारपेठ व उत्तरेश्वरपेठेतील शिवछत्रपतींच्या मूर्तींचे आगमन झाले. दरम्यान, संयुक्त राजारामपुरी, कोल्हापूर वीरशैव समाज यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

संयुक्त मंगळवारपेठ राजर्षी छत्रपती शाहू तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवासाठी 15 फूट उंच अश्वारूढ शिवछत्रपतींच्या मूर्तीचे आगमन मिरवणुकीने झाले. गुरुवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर – नंगीवली चौक- शाहू बँक चौक- मिरजकर तिकटी या मार्गावरून ढोल- ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विविध तालीम संस्था, तरुण मंडळांचे कार्यकर्ते-शिवभक्त ध्वज घेऊन जयघोष करत सहभागी झाले होते.

संयुक्त राजारामपुरी व राजारामपुरी परिसर यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवारी छत्रपती शाहू स्मृती शताब्दी जागृती अभियान सकाळी 9 वाजता होणार आहे, तर सायंकाळी 6 वाजता मर्दानी खेळ, नाशिक ढोलांच्या दणदणाटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची मिरवणूक काढून प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 आरोग्य तपासणी शिबिर, सायंकाळी 6 वाजता जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळा, कोव्हिड योद्ध्यांचा सत्कार, मराठ्यांच्या शौर्यावर आधारित ऐतिहासिक महानाट्य, ‘पानिपत’कार विश्वास पाटील लिखित ‘पानिपतचे रणांगण’ या ऐतिहासिक नाटकाचे सादरीकरण होणार आहे. सोमवारी पहाटे 5 वाजता शिवज्योतीचे आगमन, सकाळी 10 वाजता छत्रपती जन्मोत्सव, दुपारी 4 वाजता घोडे, झांजपथक, मर्दानी खेळ, पारंपरिक वेशभूषेतील मावळ्यांसह भव्य मिरवणूक निघणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -