Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगPetrol-Diesel Price: ग्राहकांना दिलासा! जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

Petrol-Diesel Price: ग्राहकांना दिलासा! जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. गेल्या अनेक दिवसांप्रमाणे आजही जनतेला दिलासा मिळाला आहे. तेलाच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 105.41 रुपये आणि डिझेलचा दर 96.67 रुपये प्रतिलिटर आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीपासून या महिन्याच्या सुरुवातीपर्यंत तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जवळपास 10 रुपयांची वाढ केली होती. मात्र, त्यानंतर कोणतीही वाढ झाली नाही.IOCL च्या ताज्या अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोल 120.51 रुपये, डिझेल 104.77 रुपये दराने विकले जात आहे.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 115.12 रुपये आहे. त्याचवेळी डिझेल 99.83 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. चेन्नईबद्दल बोलायचे तर, इथेही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. एक लिटर पेट्रोल 110.85 रुपयांना तर एक लिटर डिझेल 100.94 रुपयांना विकले जात आहे.

देशातील चार प्रमुख महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर-शहराचे नाव -पेट्रोल/ डिझेलदिल्ली- 105.41/ 96.67मुंबई- 120.51/ 104.77कोलकाता- 115.12/ 99.83चेन्नई- 110.85 100.94

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -