Monday, July 28, 2025
Homeमनोरंजनअभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला 'ईडी'चा दणका; सात कोटींची मालमत्ता जप्‍त

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला ‘ईडी’चा दणका; सात कोटींची मालमत्ता जप्‍त

ताजी बातमी ऑनलाईन टीम
मनी लाँड्रिंग प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्‍यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. तिची सात कोटी २७ लाख रुपयांची मालमत्ता जप्‍त करण्‍यात आली आहे.



२०० कोटी रुपयांच्या हवाला प्रकरणाच्या मागील वर्षी जॅकलीन फर्नांडिस हिला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी समन्स बजावले हाेते. तिची चाैकशी झाली हाेती. आजच्‍या कारवाईसंदर्भात ‘ईडी’च्‍या सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मनी लॉड्रिंग प्रकरणी अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिन फर्नांडिस हिला ५.७१ कोटी रुपयांच्‍या भेटवस्‍तु दिल्‍या होत्‍या. तसेच सुकेशने जॅकलिनच्‍या नातेवाईकांनाही महागड्या भेटवस्‍तू दिल्‍या होत्‍या. यामध्‍ये अलिशान कार, महागड्या वस्‍तू यांचा समावेश आहे. सुकेश याने दिल्‍ली येथील कारागृहात आहे. या काळातही त्‍याने एका महिलेचे २००कोटी रुपयांवर डल्‍ला मारला होता. याच पैशातून त्‍याने जॅकलिन फर्नांडिस हिला कोट्यवधी रुपयांच्‍या भेटवस्‍तू दिल्‍या. यामध्‍ये हिरे, सोन्‍याचे दागिने आणि ५२ लाखांच्‍या घोडा यांचा समावेश होता.


सुकेश याने हे सर्व पैसे मनी लॉड्रिंगमधून कमवले होते. आता जॅकलिनची संपतीच जप्‍त केल्‍याने याप्रकरणी तिच्‍या अडचणीत मोठी वाढ झाल्‍याचे मानले जात आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर तसेच त्याच्या पत्नीसह सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र तब्बल सात हजार पानी आहे. सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलीनमध्ये पैशांची देवाणघेवाण झाल्याचे ईडीच्या चौकशीत आढळून आले हाेते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -