Friday, December 19, 2025
Homeब्रेकिंगउन्हामुळे तरुणाच्या खिशातच झाला मोबाईलचा स्फोट; ‘अशी’ घ्या काळजी

उन्हामुळे तरुणाच्या खिशातच झाला मोबाईलचा स्फोट; ‘अशी’ घ्या काळजी

सध्या राज्यात नैसर्गिक आणि राजकीय वातावरण भयंकर आहे. आपण नैसर्गिक वातवरण म्हणजे उन्हाळ्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण उन्हाचा तडाखा किंवा उष्माघातामुळे आजवर अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आता या कडक उष्णतेचा परिणाम माणसांसोबतच मोबाईलवरही होताना दिसत आहे. टाईट जीन्स किंवा कपडे घालून तुम्हीही मोबाईल खिशात ठेवत असाल तर जरा सावध राहा, कारण मोबाईल उष्णतेने गरम झाल्याने त्याचा स्फोट जीन्सच्या खिशातच झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उज्जैनमध्ये घडली असून यात जीन्सच्या खिशातील मोबाईलचा स्फोट होऊन तरुणाची मांडी आणि हात भाजला आहे.

कशी घडली घटना :-निर्मल पमनानी हे उज्जैनमध्ये एक चप्पल दुकान चालवतात. निजातपुरा भागात असलेल्या आपल्या दुकानावर ते बसलेले होते. त्यांनी आपल्या जीन्सच्या पुढच्या खिशात मोबाइल ठेवलेला होता. पण तीव्र उन्हाच्या झळांमुळे खिशातला मोबाईलचा स्फोट झाला.
का आणि कसा होतो स्फोट :- जास्त उष्णतेमुळे काही सेल्स अन्स्टेबल होतात आणि एक्झोथर्मिक ब्रेकडाउन गमावतात. त्याच वेळी, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडसारखे वायू तयार होतात. या वायूंमुळे बॅटरी फुगते आणि बॅटरीचा स्फोट होऊ शकतो.

काय घ्यावी काळजी :- उन्हाळ्यात जीन्स किंवा एकदम टाईट असणारे कपडे घालून त्यात मोबाईल ठेऊ नका. तसेच कारमध्ये किंवा कुठेही सूर्यप्रकाशात जास्त वेळ मोबाईल राहणार नाही, याची काळजी घ्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -