Friday, November 14, 2025
Homeब्रेकिंगकच्च्या तेलाच्या किमतीत झाली मोठी घट

कच्च्या तेलाच्या किमतीत झाली मोठी घट

केंद्र आणि राज्य सराकारमध्ये इंधन स्वस्ताईवरुन जुंपली असताना सामन्यांची होरपळ मात्र कमी झालेली नाही. इंधन स्वस्त कधी होईल याची दोन्हीकडून कोणीच शाश्वती देत नसून ग्राहकांना मात्र दररोज महाग इंधन खरेदी करावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर कमी होताना दिसत आहेत. आजही कच्च्या तेलाच्या दरात घसरण झालेली आहे. मात्र तरीही पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थेच ठेवले.

राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये आणि मुंबईत 120.51 रुपये दराने विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लीटर तर कोलकातामध्ये पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लीटर विकले जात आहेत. ब्रेंट क्रूड सध्या जागतिक बाजारात 106 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धावर अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. युद्धामुळे मध्य पूर्वेतील कच्च्या तेलाच्या उत्पादनावर आणि पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. मात्र एवढे होऊनही कच्च्या तेलाचे भाव कमी होत असताना केंद्र आणि राज्य सरकार त्यांचे कर का कमी करत नाही? असा प्रश्न सामान्य जनतेतून उपस्थित होत आहे.

मुंबई – पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर
दिल्ली – पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल – 96.67 रुपये प्रति लिटर
बेंगळुरू – पेट्रोल 112.78 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.21 रुपये प्रति लिटर
हैदराबाद- पेट्रोल 111.42 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95.11 रुपये प्रति लिटर
अहमदाबाद – पेट्रोल 105.08 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 99.43 रुपये प्रति लिटर
चेन्नई – पेट्रोल 110.85 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर

कोलकाता- पेट्रोल 115.12 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.83 रुपये प्रति लिटर
सुरत – पेट्रोल 105.09 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 99.46 रुपये प्रति लिटर
पुणे – पेट्रोल 120.75 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 103.42 रुपये प्रति लिटर
लखनौ – पेट्रोल 105.30 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.88 रुपये प्रति लिटर
जयपूर- पेट्रोल 118.17 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 101.05 रुपये प्रति लिटर
कानपूर – पेट्रोल 105.12 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.70 रुपये प्रति लिटर
नागपूर – पेट्रोल 120.19 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 102.92 रुपये प्रति लिटर
इंदूर – पेट्रोल 118.18 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 101.22 रुपये प्रति लिटर
ठाणे- पेट्रोल 119.90 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 102.59 रुपये प्रति लिटर

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -