शरद पवारांना गप्प केल्याशिवाय अथवा बदनाम करण्याशिवाय आपले राज्यात काही चालणार नाही असे त्यांना वाटते. यापूर्वी राज ठाकरे शरद पवारांचे कौतूक करीत होते. राज्याचे राजकारण शरद पवार (political news today) यांच्या भोवती फिरते. त्यामुळे त्यांना बदनाम करण्याचा अजेंडा राज ठाकरे चालवत आहेत. आता टिका करतात. मग यापैकी कोणते खरे मानायचे? राज ठाकरे यांच्या सभा नेमक्या कोणाच्या पाठींब्याने सुरू आहेत. अशी टिका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. आज शाहू मिल येथील प्रदर्शनाची पाहणी केल्यावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
राज ठाकरे यांच्या सभे विषयी विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले,‘ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या विचाराने चालणार पक्ष आहे. सर्वांना बरोबर घेऊन गेल्याशिवाय देशाचा विचाक होणार नाही. सुशिक्षित लोकांनी राज्यात हेतूपुरस्कर वाढणारा जातीयवाद रोखला पाहीजे. राज्याचे राजकारण शरद पवार यांच्या भोवती फिरत असल्याने त्यांना बदनाम करण्याचा अजेंडा राज ठाकरेंनी घेतला आहे.
शरद पवारांना गप्प केल्याशिवाय अथवा बदनाम करण्याशिवाय आपलं राज्यात काही चालणार नाही असे त्यांना वाटते. यापूर्वी राज ठाकरे शरद पवारांचे कौतूक करीत होते. आता टिका करतात. नेमके खरे काय समजायचे. प्रबोधनकार ठाकरे यांनी सर्वधर्मसमभावाची भूमिका मांडेली आम्ही वाचली आहे. राज ठाकरे यांनी नेमके काय वाचले माहिती नाही. त्यांच्या भाषणाची दखल घेऊन त्यामध्ये काही बाबींचे उल्लंघन झाल्यास गृहविभाग कारवाई करेल. केंद्र सरकारने वन नेशन वन टॅक्स सारखे भोंग्यांबाबत देशभर एकच धोरण राबवावे.’