महाराष्ट्रदिनी झालेल्या घरफोड्यांनी सातारा जिल्हा हादरला आहे. सुट्टीच्या दिवशीच चोरट्यांनी बंद घरांना टार्गेट करून मुद्देमाल लंपास केला. सातारा, मालगाव, अपशिंगे, शिरवळ या ठिकाणी घरफोड्या झाल्या. यामध्ये तब्बल 28 तोळे सोन्यावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. याप्रकरणी त्या त्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौ.उज्वला किशोर गाडे (वय 49, रा. कोंडवे, ता. सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. तक्रारदार यांचे सदरबझार येथे ब्युटी पार्लर असून दि. 1 रोजी दुपारी साडेतीन ते साडेचार या वेळेत चोरीची घटना घडलेली आहे. तक्रारदार महिलेने रॅकमध्ये कपड्यांजवळ पर्स ठेवली होती. या पर्स मध्ये 65 हजार रुपयांचे तीन पदरी मंगळसूत्र, कर्णफुले, सोन्याचे वेल, चांदीचे पैंजण व रोख रक्केम असा मुद्देमाल होता. चोरट्याने पर्सवर डल्ला् मारत मुद्देमाल चोरुन नेला. चोरी झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
दुसरी तक्रार ताजुद्दीन बापूथाई तांबोळी (वय 63, रा. विलासपूर, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, चोरट्यांनी घराच्या खिडकीची गज कापून घरात प्रवेेश केला. कपाटाचा दरवाजा उघडून रोख 39 हजार रुपये, अर्धा तोळा वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, चांदीच्या अंगठ्या असा एकूण 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झालेला आहे.
तिसरी तक्रार विठ्ठल संभाजी हवाळ (वय 46, रा. मालगाव) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दिलेली आहे. चोरट्यांनी कपाटातील 33 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, 14 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बदाम, 15 ग्रॅम वजनाची अंगठी, 20 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, दोन मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. यानंतर अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
शिरवळमध्ये तीन फ्लॅट फोडले
शिरवळमध्ये भरदिवसा चोरट्यांनी तीन फ्लॅट फोडले. यामध्ये महावितरणचे अधिकारी असलेले तुळशीराम कुर्हाधडे यांचा फ्लॅट फोडून दागिने व रोकड असा 3 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याचबरोबर मंडाई कॉलनी व दंडाईवस्तीतही फ्लॅट फोडला मात्र तेथून किती मुद्देमाल चोरीस गेला याची माहिती समजू शकली नाही. शिरवळमधील प्रकृती टॉवर्समध्ये विद्युत अभियंता राहूल तुळशीराम कुर्हापडे हे कामावर गेले असताना त्यांचा फ्लॅट फोडण्यात आला. त्यामधून मंगळसूत्र, ब्रेसलेट, अंगठी, पेंडल असे दहा तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड असा 3 लाख 81 हजार 594 रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याचबरोबर मंडाई कॉलनीतील दत्ताराम राणे व पवारवस्तीतील योगेश लेले यांचेही फ्लॅट फोडण्यात आले आहेत. याबाबतची फिर्याद राहुल कुर्हासडे यांनी शिरवळ पोलिस ठाण्यात दिली आहे.
अपशिंगेतून पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास
सातारा येथील बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा 1 लाख 73 हजारर रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत हणमंत रामचंद्र निकम (रा. अपशिंगे) यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी 15 ग्रॅमच्या अंगठ्या, पाच ग्रॅमचे कॉईन, 14 ग्रॅमची कर्णफुले, 10 ग्रॅमच्या चैनी व रोक सात हजार असा ऐवज लंपास केला आहे.