Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगधक्कादायक : उकळते पाणी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू

धक्कादायक : उकळते पाणी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू

यावल तालुक्यातील एक वर्षाच्या चिमुकलीच्या अंगावर उकळते पाणी पडून गंभीर भाजल्याने तिच्यावर १२ दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, मृत्यूशी झुंज देतांना अखेर तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घरातील चुलीवर अंघोळीसाठी पाणी तपाविण्यासाठी ठेवले असताना दि. २१ एप्रिल रोजी सकाळी आरती कैलास भील (१, रा. मालोद ता. यावल) चिमुकली खेळत चुलीजवळ गेली. मात्र, अचानक तोल गेल्याने चुलीवरील भांड्यातील उकळते पाणी पडल्याने आरती गंभीररित्या भाजली. तिला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या १२ दिवसांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती. मात्र, मृत्यूच्या तांडवासमोर चिमुकलीचे काहीच चालले नाही आणि सोमवारी (दि.२) रात्री ११.३० वाजता तिची प्राणज्योती मालवली. या घटनेमुळे भील कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून जळगाव तालुका पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -