Monday, July 28, 2025
Homeराजकीय घडामोडीआंदोलनाच्या तयारीत असलेले मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

आंदोलनाच्या तयारीत असलेले मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. हनुमान चालीसा लावण्याच्या तयारीत असलेल्या मनसे कार्यकर्त्यांना पहाटे सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सातपूर येथील रज़विया मस्जिद येथे आज पहाटेची अजान भोंग्याविना झाली. मात्र मनसेचे कार्यकर्ते हनुमान चालीसा लावण्याच्या तयारी असतांना सातपूर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील भोंगे पोलिसांनी जप्त केले.

मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश लभडे यांच्यासह सचिन सिन्हा, विजय आहिरे, मिलिंद कांबळे, सातपूरचे मनसे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. नाशिकमध्ये सर्वच मशिदीबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त बघायला मिळाला. अनेक मशिदीवरील भोंगे आज वाजले नाही. तर काही ठिकाणी कमी आवाजात अजान झाली. पोलिसांनी आंदोलना आधीच मनसे पदाधिका-यांना नोटीस दिलेल्या होत्या. पोलीस बंदोबस्तामुळे शहराला छावणीचे स्वरूप आल्याचे नाशकात पाहायला मिळाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -