Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगसीईटी परीक्षांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ

सीईटी परीक्षांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ



ऑनलाईन टीम / मुंबई :
उच्च तंत्र शिक्षण विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या सीईटी प्रवेश परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अखेरची मुदत वाढ देण्यात आली आहे. (cet exam online application deadline extended) 11 मे पर्यंत या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. सीईटी सेलने यासंदर्भात माहिती दिली आहे.



अभियांत्रिकी, व्यवस्थापन, आर्किटेक्चर अशा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षेच्या तारखा जाहीर केल्यानंतर प्रवेश परीक्षांकरिता ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ मिळावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून सीईटी सेलकडे वारंवार होत होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून एक विशेष बाब म्हणून या सीईटी सेलकडून या परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. 4 ते 11 मे दरम्यान अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ अंतिम असून, यापुढे कोणत्याही प्रकारची मुदतवाढ ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी देण्यात येणार नाही. उमेदवारांना एमएचटी- सीईटी-2022, एमबीए/एमएमएस सीईटी 2022, एमसीए सीईटी 2022, एम.आर्च सीईटी 2022 आणि एम.एचएमसीटी 2021 साठी नोंदणी करता येणार असल्याचे सीईटी सेलने म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -