Ind Vs Eng 2nd Test भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसर्या कसोटी सामन्यात भारताने दुसर्या डावात १९३ धावांची आघाडी घेतली आहे. भारताने सामन्यातील पाचव्या दिवशी दुसर्या डावात ८ बाद २२६ धावा केल्या आहेत. पाचव्या दिवशी सामना निर्णायक अवस्थेत आला आहे.
कर्णधार ज्यो रूटच्या नाबाद १८० धावांच्या जोरावर इंग्लंडने दुसर्या कसोटीच्या पहिल्या डावात तिसर्या दिवसअखेरीस २७ धावांची नाममात्र आघाडी घेतली होती. त्यांचा पहिला डाव ३९१ धावांवर आटोपला.चौथ्या दिवशी भारताच्या सलामीवीरांनी संयमाने सुरुवात केली. मात्र दुसर्या डावात दुसर्या डावात भारताने सावध सुरुवात केली. मात्र भारताच्या सलामीवीरांनी निराशा केली.
केएल राहुल याला मार्क वूडने ५ धावांवर बाद केले. भारतला दुसरा धक्का बसला रोहित शर्मा हा २१ धावांची खेळी केली. पहिल्या डावाप्रमाणे रोहित खेळी करणार अशी सुरुवात झाली असताना मार्क वूडने त्याला तंबूची वाट दाखवली. यानंतर सॅम करनने कर्णधार विराट कोहली याला विकेटकीपर बटलरकडे झेल देणे भाग पाडले
चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात तीन बळी घेतल्याने इंग्लंडने निर्णायक आघाडी घेतल्याचे चित्र होते. अशा आव्हानात्मक परिस्थितीत चेतेश्वर पुजारा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला. दोघांनी १०० धावांची भागीदारी केली. मार्क वूडने पुजाराला ४५ धावांवर बाद केले. यानंतर अजिंक्य रहाणे (६१ धावा) आणि रवीद्र जडेजा यांना फिरकीपटू मोईन अलीने बाद केले.