कोल्हापूर शहरातील डेल्टा प्लसचे तिघेही रुग्ण ठणठणीत आहे. जुलैमध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह होते. आता त्यांची प्रकृती चांगली आहे.
कोल्हापूर शहरामध्ये १५ ऑगस्ट रोजी तीन डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्याबाबत रिपोर्ट प्राप्त झाला आहे. यामध्ये विचारेमाळ मधील एक व सानेगुरुजी वसाहत येथील १ आणि राजोपाध्येनगर येथील १ रुग्ण यांचा समावेश आहे.
तिन्ही रुग्ण जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पॉझिटिव्ह आले होते .सध्या तिन्ही रुग्णांचे आरोग्याची स्थिती व्यवस्थित आहे.
यातील दोन रुग्णांचा कोविड लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झालेला आहे.
विचारे माळ येथील रुग्ण ६२ वर्षांचा असून या एकमेव रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.
त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता भासली होती .
या तिन्ही पेशंटचे कॉन्टॅक्ट जुलै महिन्यात शोधून करून त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती.
यातील प्रत्येकी एक असे तीन कॉन्टॅक्ट पॉझिटिव्ह आले होते आणि सध्या या सर्वांची आरोग्याची स्थिती चांगली आहे.
संबधित परिसरात कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सर्वे ॲक्टिव्हिटी चालू आहेत.
नागरिकांनी कोरोना विषयक उपाय योजना मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याचे व नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
कसल्याही अफवांवर विश्वास न ठेवता कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करून स्वतः बरोबर इतरांच्याही आरोग्यची काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.