बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया डिसूजा देशमुख नेहमी चर्चेत असते. चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी जेनिलिया देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
जेनेलिया सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. जेनेलिया नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. रितेश देशमुख आणि जेनेलियाच्या मजेशीर व्हिडिओची नेहमी चर्चा होते.
जेनेलिया डिसूजा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते म्हणजे तिने नुकताच केलेल्या फोटोशूटमुळे.
जेनेलिया डिसूजाने देसी स्टाईलमध्ये फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये जेनेलियाने शरारा ड्रेस घातल्याचे दिसत आहे.
जेनेलियाने बिस्किट कलरचा सुंदर असा शरारा ड्रेस घातला आहे. त्याला साजेसा मेकअप आणि ज्वेलरी तिने घातली आहे. या लूकमध्ये जेनेलिया खूपच सुंदर दिसत आहे.
जेनेलियाने हे फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले असून या फोटोंना तिच्या चाहत्यांनी खूप चांगली पसंती दिली आहे.
जेनेलियाचे हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.








