काही दिवसांपूर्वीच Jio ने आपल्या वापरकर्त्यांना एक उत्तम गिफ्ट देत चार नवे प्रीपेड प्लॅन (Reliance Jio Prepaid Plan) लाँच केले आहेत. यात यूजर्संना डिस्ने + हॉटस्टारचे (Disney + Hotstar) सबस्क्रिप्शन 3 महिन्यांसाठी मोफत देण्यात येत आहे. त्यानंतर आता जिओच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी प्रतिस्पर्धी कंपनी एअरटेल देखील मैदनात उतरली आहे. एअरटेलनेही दोन जबरदस्त प्लॅन लॉन्च (Airtel Prepaid Plan) केले आहेत. या दोन्ही प्लॅनसोबत यूजर्संना अनेक चांगले फायदे मिळतील आणि विशेष म्हणजे यासोबत डिस्ने + हॉटस्टारचे 3 महिन्यांसाठी पूर्णपणे फ्री सबस्क्रीप्शन दिले जात आहे.
डिस्ने + हॉटस्टारचे (Disney+ Hotstar) मोफत सबस्क्रिप्शन प्लॅन खास आयपीएलचे (IPL 2022) चाहते असलेले आणि एकही सामना गमावू इच्छित नसलेल्या यूजर्संना लक्षात घेऊन लॉन्च करण्यात आले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला डिस्ने + हॉटस्टारवर विनामूल्य आयपीएल सामन्यांचा आनंद घ्यायचा असेल तर एअरटेलचे हे दोन धनसू प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत. त्यांची किंमत 399 रुपये आणि 839 रुपये आहे. या प्लॅनविषयी सविस्तर जाणून घेऊया.
एअरटेलचा 399 रुपयांचा प्लान
एअरटेलच्या 399 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे तर याची वैधता 28 दिवसांची आहे आणि यामध्ये यूजर्सना तीन महिन्यांसाठी Disney + Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे. याशिवाय दररोज 2.5GB डेटाही मिळेल. तसेच कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळेल. या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएसही दिले जात आहेत. एवढेच नाही तर यूजर्सना या प्लानसोबत एक महिन्याचे Amazon Prime Video Mobile Edition चे सबस्क्रिप्शन देखील मिळेल.
एअरटेलचा 839 रुपयांचा प्लान
एअरटेलच्या 839 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर त्यात 84 दिवसांची वैधता दिली जात आहे. याशिवाय डिस्ने + हॉटस्टार आणि एअरटेल एक्सस्ट्रीम मोबाइल सबस्क्रिप्शन देखील 3 महिन्यांसाठी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 2GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मोफत मिळतील.