Monday, July 7, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर होणार शंभर सेकंद स्तब्ध ; राजर्षी शाहू छत्रपतींना आज अभिवादन

कोल्हापूर होणार शंभर सेकंद स्तब्ध ; राजर्षी शाहू छत्रपतींना आज अभिवादन

रयतेचे राजे राजर्षी शाहू छत्रपतींना स्मृती शताब्दीनिमित्त शुक्रवारी अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता शंभर सेकंद आहे त्या ठिकाणी उभा राहून लोकराजाला तमाम जनता मानवंदना देणार आहे. यामुळे प्रथमच कोल्हापूर शंभर सेकंद स्तब्ध होणार असून, या उपक्रमाद्वारे राजर्षींबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कार्याला वंदन करणार आहे.

नर्सरी बागेतील शाहू समाधिस्थळी अभिवादनाचा कार्यक्रम होईल. यानंतर कृतज्ञता पर्वाचा मुख्य कार्यक्रम शाहू मिल येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. या समारंभास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार ऑनलाईन, तर शाहू महाराज, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, पालकमंत्री सतेज पाटील व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, दैनिक ‘पुढारी’चे समूह संपादक व चेअरमन डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांच्यासह आजी-माजी आमदार, खासदार प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. राजर्षी शाहू छत्रपतींचे यंदाचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने यानिमित्त लोकराजा कृतज्ञता पर्वाचे आयोजन केले आहे. दि. 18 एप्रिलपासून सुरू झालेले हे पर्व दि. 22 मेपर्यंत सुरू राहणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे राजर्षींच्या विचारांचा जागर सुरू आहे. शुक्रवारी या पर्वात नर्सरी बागेतील शाहू समाधिस्थळी मान्यवरांच्या उपस्थितीत राजर्षींना अभिवादन केेले जाणार आहे. यानंतर सकाळी दहा वाजता संपूर्ण शहर आणि जिल्ह्यात 100 सेकंद जागेवर उभा राहून राजर्षींना मानवंदना दिली जाईल.

शुक्रवारी सकाळी दहा वाजता शंभर सेकंद कोल्हापूर स्तब्ध होणार आहे. जिथे असेल त्या जागेवर शंभर सेकंद स्तब्धता पाळून राजर्षींना मानवंदना दिली जाईल. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील नऊ सिग्नभल या कालावधीत ‘रेड’ होतील. एस.टी. बसेस तसेच अन्य वाहने, जाग्यावर थांबवली जातील. विविध कार्यालयांतील कर्मचारी, अधिकारी, व्यापारी, उद्योजक, विक्रेते, प्रवासी, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठातील विद्यार्थी आदी सर्वच नागरिक या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

कृतज्ञता फेरी, बिगुलही वाजणार
राजर्षी शाहूंच्या वास्तू, ठिकाणांहून पाच कृतज्ञता फेर्याक काढल्या जाणार आहेत. या फेर्या सकाळी साडेनऊ वाजता शाहू समाधिस्थळी येतील. यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण केली जाईल. त्यानंतर सकाळी दहा वाजता बिगुल वाजवला जाईल. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात बसवलेल्या पब्लिक अॅवड्रेस सिस्टीमवरून या बिगुलचा आवाज जिल्ह्याच्या कानाकोपर्यारत जाईल आणि त्यानंतर पुढच्या शंभर सेकंदांसाठी आपल्या लाडक्या राजासाठी संपूर्ण शहर आणि जिल्हा स्तब्ध होईल.

अवघे शहर रस्त्यावर येणार
राज्यात प्रथमच अशा अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली जाणार आहे. या उपक्रमासाठी संपूर्ण शहरच रस्त्यावर येणार आहे. विविध सार्वजनिक मंडळे, संस्था, संघटनांनी ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. चौकाचौकांत नागरिक थांबून स्तब्धता पाळणार आहेत. त्याची तयारी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी राजर्षींना अभिवादन करणारे तसेच त्यांच्या कार्याची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. समाधिस्थळीही सर्व तयारी करण्यात आली आहे.

शहर आणि जिल्ह्यात चित्ररथ
राजर्षी शाहूंच्या जीवनकार्याचे दर्शन घडवणारा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. त्याचे दुपारी तीन वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल. यानंतर हा चित्ररथ शहरात फिरणार आहे. त्यानंतर तो प्रत्येक तालुक्यात जाणार आहे.
प्रमुख सिग्नल शंभर सेकंद ‘रेड’

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -