Sunday, December 22, 2024
Homeक्रीडा‘टाटां’चे आव्हान रोहित शर्माने पूर्ण केलं, काझीरंगातील गेंड्यांसाठी मिळणार 5 लाख रुपये

‘टाटां’चे आव्हान रोहित शर्माने पूर्ण केलं, काझीरंगातील गेंड्यांसाठी मिळणार 5 लाख रुपये

‘इंडियन प्रीमियर लिग’ अर्थात ‘आयपीएल’चा यंदाचा 15 वा सिजन ‘मुंबई इंडियन्स’साठी काही खास राहिला नाही.. तब्बल 5 वेळा ‘आयपीएल’चं विजेतेपद मिळवणाऱ्या या संघाचा यंदाच्या पर्वात सलग 8 सामन्यात पराभव झाला. त्यानंतर सलग दोन सामने जिंकून मुंबईचा संघ पुन्हा विजयपथावर परतलाय..
‘गुजरात टायटन्स’ विरुद्ध ‘मुंबई इंडियन्स’ यांच्यातील ‘आयपीएल’चा 51 सामना शुक्रवारी (ता. 6) खेळला गेला. त्यात मुंबईच्या कर्णधार रोहित शर्माने स्फोटक फलंदाजी करताना 43 धावांची खेळी साकारली. या खेळीदरम्यान रोहितच्या बॅटने असा काही कारनामा केला, की काझीरंगाच्या गेंड्यांना भेट म्हणून चक्क 5 लाख रुपये मिळणार आहेत.

नेमकं काय झालं..?
‘आयपीएल’च्या यंदाच्या पर्वाची अधिकृत प्रायोजक ‘टाटा’ कंपनी आहे. त्यामुळे मॅच सुरु असताना, मैदानात सीमारेषेबाहेर ‘टाटा पंच’ ही कार उभी केलेली असते.. टाटांनी अशी घोषणा केली होती, की जर एखाद्या फलंदाजाने मारलेला चेंडू या कारला किंवा टाटा पंच बोर्डावर लागल्यास आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला 5 लाख रुपये ‘टाटां’कडून दिले जातील.
‘टाटांं’चं हे आव्हान रोहित शर्माने पूर्ण केलं.. गुजरातकडून दुसरी ओव्हर टाकण्यासाठी वेस्ट इंडिजचा गोलंदाज अल्जारी जोसेफ आला.. त्याचा या ओव्हरमधील अखेरचा चेंडू रोहित शर्माने डीप मिडविकेटच्या दिशने जोरात मारला.. हा शॉट इतका अफलातून होता, की गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषेबाहेर गेला, तो थेट ‘टाटा पंच’वर आदळला.

रोहितच्या या शाॅटमुळे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला 5 लाख रुपये मिळणार आहेत.. काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने रोहितने चांगल्या कामाला हातभार लावला आहे.
डेनियल सॅम्सची कमाल
या सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, मुंबईने गुजरात टायटन्ससमोर 178 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाला 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 172 धावाच करता आल्या. अखेरच्या षटकात ‘गुजरात’ला विजयासाठी 9 धावांची गरज होती, पण डेनियल सॅम्सने फक्त 3 धावा देताना मुंबईला अशक्यप्राय विजय मिळवून दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -