तंत्रज्ञानाच्या काळात हातात स्मार्टफोन आला नि प्रत्येक जण ‘स्मार्ट’ झाला.. दिमतीला अनेक ‘अॅप्स’ आले. सगळी कामे घरबसल्या अगदी चुटकीसरशी होऊ लागली.. मात्र, त्यात एक घोळ झाला.. प्रत्येक ‘अॅप’ला वेगळा ‘लाॅग इन’ आयडी नि वेगळा ‘पासवर्ड’.. काय काय लक्षात ठेवणार..? सगळाच गोंधळ उडाला.
अनेक पासवर्ड लक्षात ठेवताना, तुमचीही अशीच अवस्था होत असणार.. पण घाबरु नका.. कारण तुमच्या मदतीला थेट ‘गुगल’ आलंय.. त्यामुळं आता असे वेगवेगळे पासवर्ड लक्षात ठेवण्याची झंझटच संपणार आहे… गुगल (Google), अॅपल (Apple) नि मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) अनेक अकाउंट्स, सर्विस आता विना पासवर्ड ‘लॉग-इन’ करता येणार आहेत.
जगातील वरील तीन प्रमुख टेक कंपन्यांनी एकत्रितच एक घोषणा केलीय. त्यानुसार, आता एक असं फीचर येणार आहे, की ज्यात कोणत्याही पासवर्डशिवाय युजर्स ‘लॉग-इन’ करु शकणार आहेत. हा नवा बदल प्रत्येक डिव्हाइस आणि ऑपरेटिंग सिस्टममध्ये होणार आहे.. त्यामुळे युजर्सकडून आनंद व्यक्त केला जात आहे..
अँड्रॉइड, आयओएस (iOS), क्रोम-ओएस, क्रोम ब्राउजर, एज, सफारी आणि मॅक-ओएस सारख्या अनेक प्लॅटफॉर्मवर युजर्सला या नवीन अपडेटचा फायदा होणार आहे. ‘स्मार्टफोन’ असो, ‘डेस्कटॉप’ असो की ‘ब्राउजर डिव्हाइसेज’.. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला या नवीन अपडेटचा फायदा होणार आहे..
‘हे’ अपडेट येणार..
टेक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कोणत्याही पासवर्डशिवाय युजर्स आता सहज ‘लॉग-इन’ करू शकतील.. त्यासाठी एक खास ‘क्रिप्टोग्राफिक टोकन’ किंवा ‘एफआयडीओ’ ‘क्रेडेंशियल’चा वापर केला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला विना पासवर्ड अकाउंटमध्ये ‘लॉग-इन’ करता येईल.