Wednesday, July 30, 2025
Homeब्रेकिंगगॅस टँकर पलटी होऊन भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

गॅस टँकर पलटी होऊन भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बोरघाटामध्ये गॅस टँकर पलटी होऊन अपघात झाला आहे. हा गँस टँकर पुण्यावरुन मुंबईच्या दिशेने येत होता. या अपघातावेळी गँस टँकरलातीन वाहनांनी जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरघाटातून गँस टँकर खाली उतरत होता. खोपोली एक्जिटजवळ उतारावर टँकर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि टँकर रस्त्यावर पलटी झाला. या टँकरला तीन गाड्यानी जोरदार धडक दिली. दुपारी 12 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या टँकरमध्ये प्रोपोलिन गँस असल्याचे सांगितले जात आहे. टँकर पलटी झाल्यामुळे दोन्ही दिशेची वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच, बोरघाट पोलिस यंत्रणा, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या घटनास्थळावर मदतकार्य सुरु आहे. अपघातानंतर टँकर पलटी झाला पण सुदैवाने टँकरमधील गॅस गळती झाली नाही. या अपघातामध्ये टँकर चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले आहे. रस्त्यावर पलटी झालेला टँकर आणि दोन कार अग्निशमन दलाचे जवान बाजूला हटवण्याचे काम करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -