बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास काही महिन्यांपूर्वीच आई-बाबा झाले. सरोगसीच्या माध्यमातून प्रियांका चोप्राने मुलीला जन्म दिला. आई-बाबा झाल्यामुळे प्रियांका आणि निकच्या घरी खूपच आनंदाचे वातवरण आहे. पण त्यांची छोटी परी जन्मानंतर जवळपास 100 दिवस हॉस्पिटलमध्येच होते. नुकताच त्यांची परी घरी आली. तिचे घरामध्ये मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे. प्रियांका चोप्राच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक होते अखेर त्यांना परीचा चेहरा पाहायला मिळाला आहे.
नुकताच प्रियांकाने तिच्या मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
प्रियांका आणि निकने आपल्या मुलीचे नाव ‘मालती मेरी चोप्रा’ (Malati Meri chopra) असे ठेवले आहे. प्रियंकाने मदर्स डेच्या निमित्ताने आपल्या मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. 100 दिवस रुग्णालयामध्ये घालवल्यानंतर त्यांची मुलगी मालती पहिल्यांदा घरी आली आहे. प्रियांका आणि निकने मालतीसोबत फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये प्रियंका मालतीला छातीशी कवटाळलं असल्याचे दिसत आहे. मालतीची पहिली छलक पाहून दोघांचेही चाहते खूप आनंदी झाले असून सोशल मीडियाच्या माध्यमातून ते दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
प्रियांकाने आपल्या लेकीसोबतचा पहिला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये प्रियांकाने असे म्हटेल आहे की, ‘गेले काही दिवस आमच्यासाठी रोलर कोस्टर राईडसारखे होते. याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल याची आम्हाला कल्पना आहे. NICU मध्ये 100 पेक्षा जास्त दिवस राहिल्यानंतर अखेर आज आमचे बाळ घरी आले. प्रत्येक कुटुंबासाठी हा प्रवास अनोखा असतो आणि त्यासाठी एका विशिष्ट स्तरावरील विश्वासाची आवश्यकता असते. आमच्या आयुष्यातील गेले काही महिने फार आव्हानात्मक होते. आम्ही आता मागे वळून पाहिलं तर प्रत्येक क्षण किती मौल्यवान आणि परिपूर्ण आहे, याची जाणीव मला होते.
प्रियांका पुढे म्हणते की, ‘आमची चिमुकली घरी आल्याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे. आम्ही लॉस एंजेलिसमधील रेडी चिल्ड्रन्सला जोला अँड सेडर्स सिनाई मधील प्रत्येक डॉक्टर, नर्स आणि तज्ज्ञांचे आभार मानतो. त्यांनी फार निस्वार्थपणे हे काम केले. यानंतर आता आमचा पुढचा प्रवास आता सुरु होत आहे. आमचे बाळ खरोखरच फार लढाऊवृत्तीचं आहे. चला तर पुढे जाऊया. आई आणि बाबांचे तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्या आयुष्यातील सर्व मातांना आणि काळजी घेणाऱ्या सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा. तुम्ही माझ्यासाठी हे सर्व सोपे केले आहेत.’ तसंच, ‘निक जोनास मला आई बनवल्याबद्दल तुझे देखील आभार. मी तुझ्यावर प्रेम करते.’, असे प्रियांकाने सांगितले.