Saturday, July 26, 2025
Homeमहाराष्ट्रबेडगमध्ये वृद्धेचा निर्घुण खून.

बेडगमध्ये वृद्धेचा निर्घुण खून.

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बेडग (ता. मिरज) येथे वसुदा गुरुपाद लकडे (वय. 62) या वृद्धेचा अज्ञाताने निर्घुण खून केला. रविवारी (दि.8) रोजी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वसुदा यांचे लग्न झाले होते. परंतु गेल्या ३५ वर्षांपासून त्‍या माहेरीच राहत होत्या. रविवारी सायंकाळी त्या नेहमी प्रमाणे त्यांच्या शेतात असलेल्या म्हसोबा मंदिराकडे गेल्या होत्या. परंतु बऱ्याचवेळ झाला तरी त्या घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली.

दरम्‍यान, घरापासून जवळपास 700 मीटर अंतरावर असलेल्या ऊसाच्या शेतातील पायवाटेपासून 20 फूट आत त्‍यांचा मृतदेह दिसून आला. त्यांच्या शरीरावर व चेहर्‍यावर जखमा झाल्या होत्या. अज्ञाताने हत्याराने हल्ला करून खून केला. परंतु वसुदा यांच्या अंगावर असलेले सोने मात्र आहे तसेच होते.त्यामुळे वसुदा यांचा नेमका कोणत्या कारणातून खून करण्यात आला हे मात्र समजू शकले नाही. त्यांच्या खूना संदर्भात मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूदृ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -